unfoldingWord 46 - पौल ख्रिस्ती बनतो
ዝርዝር: Acts 8:1-3; 9:1-31; 11:19-26; 13-14
የስክሪፕት ቁጥር: 1246
ቋንቋ: Marathi
ታዳሚዎች: General
ዓላማ: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
ሁኔታ: Approved
ስክሪፕቶች ወደ ሌሎች ቋንቋዎች ለመተርጎም እና ለመቅዳት መሰረታዊ መመሪያዎች ናቸው። ለእያንዳንዱ የተለየ ባህል እና ቋንቋ እንዲረዱ እና እንዲስማሙ ለማድረግ እንደ አስፈላጊነቱ ማስተካከል አለባቸው። አንዳንድ ጥቅም ላይ የዋሉ ቃላቶች እና ጽንሰ-ሐሳቦች የበለጠ ማብራሪያ ሊፈልጉ ወይም ሊተኩ ወይም ሙሉ ለሙሉ ሊተዉ ይችላሉ.
የስክሪፕት ጽሑፍ
शौल हा तरुण मनुष्य स्तेफनाला दगडमार करणा-यांची वस्त्रे सांभाळत होता.तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वासी लोकांचा छळ करत असे.यरुशलेममध्ये तो घरोघरी जाऊन विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीया आणि पुरूषांस दोघांसही तुरूंगात टाकत असे.महायाजकाने शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
शौल दिमिष्काच्या मार्गावर प्रवास करत असतांना, अचानक त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर पडला.शौलाने कोणी तरी हाक मारतांना ऐकले, "शौला!शौला!तू माझा छळ का करतोस?"शौलाने विचारले, "प्रभु, तू कोण आहेस?"येशूने त्यास म्हटले, "मी येशू आहे.ज्याचा तू छळ करत आहेस!"
शौल जेव्हा उठला, तेव्हा त्याला कांही दिसेना.तेव्हा त्याच्या मित्रांना त्याला दिमिष्कास न्यावे लागले.शौलाने तीन दिवस काहीच खाल्ले व प्याले नाही.
दिमिष्कात हनन्या नावाचा एक शिष्य होता.देव त्यास म्हणाला, "शौल रहात असलेल्या घरी जा.आणि त्याच्यावर आपले हात ठेव म्हणजे त्यास पुन्हा दृष्टी मिळेल."परंतु हनन्या म्हणाला, "प्रभूजी, मी ऐकले आहे की हा मनुष्य कशाप्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ केला आहे."देव त्यास म्हणाला, "जा!कारण यहूदी लोकांसमोर व परराष्ट्रीयांसमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता मी त्याला निवडलेले आहे.माझ्या नावासाठी तो खूप दुःख सोसणार आहे."
तेव्हा हनन्याने शौलाकडे जाऊन त्याजवर आपले हात ठेवले व म्हणाला, "जो येशू तुला मार्गामध्ये प्रकट झाला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे, अशासाठी की, तुझी दृष्टी तुला पुन्हा प्राप्त व्हावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस."लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला.मग शौलाने अन्न घेतले व त्यास शक्ति मिळाली.
लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच देवाचा पुत्र आहे."यहुद्यांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले की ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा आता येशूवर विश्वास ठेवतो व त्याचा प्रचार करत आहे!शौलाने तर्कशुद्ध संभाषण करून यहूद्यांना येशू हा मसिहा असल्याचे सिद्ध केले.
पुष्कळ दिवसांनंतर, यहूद्यांनी शौलास मारण्याचा कट रचला. शौलाला मारण्यासाठी त्यांनी त्याच्यावर नजर ठेवली व शहराच्या वेशीजवळ काही लोक नेमले.परंतु शौलाला हा कट समजला, व त्याच्या मित्रांनी त्याची सुटका करण्यास मदत केली.एके रात्री त्यांनी वेशीच्या भिंतीवरून एका पाटी (मोठी टोपली) मध्ये बसवून त्याला खाली सोडले. शौल दिमिष्कातून, सुटल्यानंतर येशूविषयी प्रचार करू लागला.
शौल यरूशलेमेस शिष्यांना भेटण्यासाठी गेला, परंतू त्यांना त्याची भिती वाटली.तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणाऱ्याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला.त्यानंतर शिष्यांनी त्याचा स्विकार केला.
यरूशलेमेतील छळामुळे काही विश्वासणारे दूर अंत्युखिया शहरामध्ये गेले व तेथे त्यांनी येशूविषयी प्रचार केला.अंत्युखिया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण प्रथमच, त्यांच्यापैकी पुष्कळ लोक सुद्धा विश्वासणारे झाले.बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले.अंत्युखिया येथील येशूवर विश्वास ठेवणा-यांना प्रथमच "ख्रिस्ती" म्हटले गेले.
एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा."तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले.आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठविले.बर्णबा व शौल यांनी पुष्कळ वेगवगळ्या लोकगटांस सुवार्ता सांगितली व पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेविला.