unfoldingWord 13 - देवाचा इस्राएलाशी करार
ዝርዝር: Exodus 19-34
የስክሪፕት ቁጥር: 1213
ቋንቋ: Marathi
ታዳሚዎች: General
ዓላማ: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
ሁኔታ: Approved
ስክሪፕቶች ወደ ሌሎች ቋንቋዎች ለመተርጎም እና ለመቅዳት መሰረታዊ መመሪያዎች ናቸው። ለእያንዳንዱ የተለየ ባህል እና ቋንቋ እንዲረዱ እና እንዲስማሙ ለማድረግ እንደ አስፈላጊነቱ ማስተካከል አለባቸው። አንዳንድ ጥቅም ላይ የዋሉ ቃላቶች እና ጽንሰ-ሐሳቦች የበለጠ ማብራሪያ ሊፈልጉ ወይም ሊተኩ ወይም ሙሉ ለሙሉ ሊተዉ ይችላሉ.
የስክሪፕት ጽሑፍ
तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.मोशेने जेथे जळते झाड पाहिले होते, तो हाच पर्वत होता.लोकांनी पर्वताच्या पायथ्याशी आपले तंबू ठोकले.
देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक व्हाल, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."
तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.पर्वतावर जाण्याची परवानगी केवळ मोशेलाच होती.
मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले.तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."
"आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका व तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुझा देव ईर्षावान देव आहे.तू माझे नाव व्यर्थ घेऊ नकोस.शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा विश्रांतीचा दिवस व माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ."
"आपल्या बापाचा व आईचा मान राख.तू खून करू नकोस.तू व्यभिचार करू नकोस.तू चोरी करू नकोस.तू खोटी साक्ष देऊ नकोस(खोटे बोलू नकोस.)तू आपल्या शेजा-याच्या बायकोचा, त्याच्या घराचा, किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नकोस."
मग देवाने ह्या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या.देवाने त्यांना पालन करण्यासाठी आणखी पुष्कळ नियम व विधी देखिल दिले.जर त्यांनी हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यांना आशीर्वाद व संरक्षण देण्याचे अभिवचन दिले.जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले, तर देव त्यांना शासन करील.
देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशिलवार माहिती दिली.ह्याला निवासमंडप म्हणत, यामध्ये दोन खोल्या होत्या व त्यांना दुभागणारा एक मोठा पडदा होता.पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ महायाजकासच जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवासमंडपा समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे.याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे.त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरत असे.मोशेचा भाऊ अहरोन व अहरोनाचे संतान यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.
देवाने दिलेल्या आज्ञा पाळावयास व केवळ त्याचीच उपासना करून त्याचे खास लोक होण्यास इस्राएल लोक सहमत झाले.परंतु देवाला आज्ञापालनाचे वचन दिल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी भयंकर पाप केले.
पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता. लोकांना त्याची वाट पाहता-पाहता कंटाळा आला.म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते अहरोनाकडे दिले.
अहरोनाने त्याची एक वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली.लोक बेभान होऊन तिची पूजा करू लागले व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले.त्यांच्या पापामुळे देवाला त्यांचा भयंकर राग आला व त्याने त्यांचा नाश करावयाचे ठरविले.
परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.मोशेने पुन्हा दहा आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या.
मग त्याने त्या मूर्तीचा कुटून चुरा केला, तो त्याने पाण्यामध्ये टाकला व लोकांना ते पाणी प्यावयास दिले.देवाने लोकांवर भयानक पीडा पाठविली व त्यांपैकी बरीचशी माणसे त्यामध्ये मरण पावली.
मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने लोकांच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली.देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली.मोशे दहा आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावरुन खाली उतरतो. मग देवाने सीनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यास लोकांचे मार्गदर्शन केले.